ऑनलाईन बुक केलेली रिक्षा रद्द केल्याच्या रागातून एका तरुणाला बेदम मारहाण करून तीन हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी (दि. १४ डिसेंबर) रोजी रात्री ९ ते १० वाजण्याच्या सुमारास, मावळ तालुक्यातील आंबी येथील डी. वाय.पाटील कॉलेज जवळ घडली.