जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय यवतमाळ येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
6.8k views | Yavatmal, Maharashtra | Mar 12, 2025 यवतमाळ : आरोग्य विभाग,जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ येथील सभागृहामध्ये 08 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मेघराज पुराम तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.ग्रेसपूंजे मॅडम सहायक प्राध्यापक आयुर्वेद महाविद्यालय यवतमाळ , डॉ. कपिल गोटे DRCHO, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. स्मिता पेटकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. प्रीती दुधे, डॉ. राज बनसोड मानसिक आरोग्य यांनी मार्गदर्शन केले तर या निमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.