नांदेड: मुलगा पाहिजे म्हणून विठ्ठलनगर येथे 25 वर्षीय विवाहितेस सतत त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले; पतीसह इतर तिघांवर गुन्हा
Nanded, Nanded | Nov 28, 2025 नांदेड शहरातील विठ्ठलनगर येथे दि २५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी तीनच्या सुमारास यातील मयत नामे प्रतीक्षा लक्ष्मण भोसले वय २५ वर्षे हीस यातील आरोपी नामे १) लक्ष्मण भोसले २) माधुरी देशमुख ३) दिपाली देशमुख ४) भाग्यश्री देशमुख यांनी मयतास मुलगा पाहिजे म्हणून सतत शिवीगाळ करून मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देऊन तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले याप्रकरणी फिर्यादी राजेश्वर वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज रोजी दुपारी विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सुरू आहे