शिरूर कासार: रामभाऊ खाडे यांच्या हल्ल्यामागील मास्टरमाईंड शोधा, शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची मागणी
सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. आज ते मृत्यूशी झुंज देत आहेत आणि शासन मात्र शांत आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, रामभाऊ खाडे यांनी तुमच्या अनेक नेत्यांचे घोटाळे उघड केले. आष्टी येथील देवस्थान जमीन घोटाळा, अनधिकृत बांधकामांवर लावलेले स्टे आणि इतर अनेक गैरव्यवहार मग सरळ प्रश्न आहे की, रामभाऊ खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला कोणी केला? या हल्ल्यामागचा मास्तरमाईंड कोण आहे? त्याला शोधून काढावे अशी मागणी मेहबूब शेख यांनी केली आहे.