शहादा: रहाट्यावड धरणाचे काम होत नसल्याने शेतकरी आक्रमक, जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा
शहादा तालुक्यातील रहाटयावड धरणाचा प्रश्न गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित असून सद्यस्थितीत गेल्या आठ वर्षांपासून धरणाचे काम रखडले आहे या धरणामुळे जवळपासच्या १५ गावांना पाणीटंचाईचा समस्येपासून मुक्तता होणार आहे मात्र एकदा मागणी करूनही धरणाचे काम होत नसल्याने शेतकरी आता चांगलेच आक्रमक झाले असून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा दिलाय.