छत्रपती संभाजीनगर ते नागपूर महामार्गावर भरधाव ट्रकने मोटरसायकलला जबर धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी किन्हीराजा गावाजवळ घडली. या अपघातात आशीष उर्फ अजय गोरटे (वय २०) या युवकाचा मृत्यू झाला असून विजय कानडे (वय २५) आणि सागर बावणे (वय २३) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत