जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात भांडणाच्या किरकोळ कारणावरून अवैध अग्निशस्त्राचा वापर करून एका कंपनी कामगार तरुणाचा खून करणाऱ्या अट्टल आरोपी पती-पत्नीला एमआयडीसी पोलिसांनी केवळ २४ तासांत मोठ्या शिताफीने मंगळवारी 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.