जालना शहरातील चंदनझिरा परिसरात घडलेल्या गंभीर मारहाण आणि जबरदस्तीने मोबाईल हिसकावून नेण्याच्या प्रकरणात चंदनझिरा पोलिसांनी तातडीची कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रविवार दि. 8 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी काही दिवसापुर्वी एका तरुणाला बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात सुरज कैलास गायकवाड आणि राहुल कैलास गायकवाड या दोघांविरुद्ध गंभीर मारहाण करण्याचा गुन्हा दाखल आहे.