औसा बस आगारातील वाहक तथा भादा येथील रहिवासी मन्मथ क्षीरसागर यांच्या शेतात चोरी झाली असून या चोरीत चोरट्यांनी हरभरा व सोयाबीनच्या गोण्या पळविल्या आहेत. भादा औसा रस्त्यालगत क्षीरसागर यांची शेती असून सकाळी ते आपल्या शेतात आले असता त्यांना शेतातील शेडमध्ये ठेवलेले हरभरा व सोयाबीनच्या गोण्या चोरी झाल्याची बाब निदर्शनास आली. क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.