पेठ: काळूणे येथे आयएएस अधिकारी अर्पिता ठूबे यांनी भेट देऊन केली ग्रामविकासाच्या कामांची पाहणी
Peint, Nashik | Sep 19, 2025 आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा आयएएस अरपिता थुबे यांनी आज काळुने गावाला भेट देऊन ग्रामविकास कामांचा आढावा घेतला. ग्रामस्थांनी वारकरी पद्धतीने त्यांचे स्वागत केले.या भेटीत स्वदेश फाउंडेशनमार्फत राबविण्यात आलेली पाणीपुरवठा योजना, नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापनातील शेततळी आदी प्रकल्प पाहिले. तसेच शाळा स्वच्छता व शौचालयाचे उद्घाटन करून योजना ग्रामसमितीकडे सुपूर्द करण्यात आली. अरपिता ठुबे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या विकासकामावर चर्चा केली.