गोरेगाव: तालुक्यातील बोटे परिसरात पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या धान पिकाची केली पाहणी
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे धान पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याबद्दल पालकमंत्री इंद्रनील नाईक यांना निवेदन देण्यात आले.माजीआमदार राजेंद्र जैन, आमदार राजकुमार बडोले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष केबलभाऊ बघेले शहर अध्यक्ष कृष्णकुमार बिसेन आदी उपस्थित होते. बोटे येथील शेतात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची यावेळी पाहणी केली. गोरेगाव तालूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई व कर्जमाफी करण्यात यावी. असे निवेदन देण्यात आले.