विक्रमगड: विरार येथे विद्या संकुलाच्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर कोसळले चिंचेचे झाड
विरार येथे एका विद्या संकुलच्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर चिंचेचे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. भाऊसाहेब वर्तक विद्या संकुलच्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर अचानक भले मोठे चिंचेचे झाड कोसळले यामुळे कमान तुटली. घटना घडली त्यावेळी आसपास कोणीही नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टाळली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे व्यवहार घटनास्थळी दाखल झाले आणि कोसळलेले झाड हटवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आले. चिंचेचे झाड कमानीवर कोसळल्याने कमानीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.