पाच-सहा वर्षांपूर्वी झालेल्या प्रेमविवाहाचा घटस्फोट झाल्याने मानसिक तणावात असलेल्या आमगाव (दिघोरी) येथील ३२ वर्षीय दिनेश नरेश झंझाड या तरुणाने राहत्या घरी विषारी औषध पिऊन आपली जीवनयात्रा संपविली. २५ डिसेंबर रोजी सकाळी ६:०० ते ८:३० वाजण्याच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. घटनेच्या दिवशी सकाळी वडिलांनी कामावर जाण्यासाठी उठविले असता, दिनेशने शौचालयातून परत येऊन पलंगावर झोप घेतली, मात्र काही वेळातच त्याला उलट्या होऊ लागल्या. नातेवाईकांनी जवळ जाऊन पाहिले असता पलंगाखाली तांदळात टाकायचे..