जालना शहरातील सकलेचा नगर परिसरात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी महानगरपालिकेच्या निरीक्षकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बुधवार दि. 12 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसान अनधिकृत बांधकाम इमारत निरीक्षक यांच्या तक्रारीनुसार संबंधित बांधकाम हे परवानगीपेक्षा अधिक जागेत करण्यात आले असून, यामुळे शासन आदेशांचे उल्लंघन झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कोमल गणेश कुमावत यांच्यावर सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.