विक्रमगड: मालजीपाडा परिसरात कंटेनरचा अपघात
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरचा अपघात घडला आहे. कंटेनर चालकाचे कंटेनर वरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर महामार्गावरील संरक्षक भिंतीला धडकून उलटला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर महामार्गावरून बाजूला सारून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.