आर्णी: दुसऱ्याची शेती दाखवून १२ लाखाला फसवले;मुकिंदपुर येथील घटना
Arni, Yavatmal | Oct 21, 2025 शेतीची विक्री करण्यासाठी दुसऱ्याची शेती दाखवत, विक्रीचा सौदा करून एका महिलेची बारा लाखाने फसवणूक केली. ही घटना शनिवारी दि. १८ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी कस्तुरी पावडे (३८, रा. मुकिंदपूर ता. आर्णी) यांनी शनिवारी आर्णी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, आर्णी तालुक्यातील मुकिंदपूर येथील दुर्गेश ठाकरे यांची मौजा अंबोडा व मुकिंदपुर शिवारात शेत जमीन आहे. ठाकरे यांनी यावर्षी त्यांची मौजा अंबोडा येथील शेत सव्र्व्हे क्रमांक ७१/६ एकूण क्षेत