छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर पोलीस नशेविरोधात गेल्या काही दिवसांपासून चांगलेच ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलिसांनी नशेखोरी विरोधात धडाकेबाज कामगिरी करत गेल्या काही महिन्यात जवळपास 250 च्या वर गुन्हे दाखल करत 400 आरोपींना अटक केली आहे.गुन्हेगारामध्ये पोलिसांच्या धिंड पॅटर्नमुळे दहशत पसरली आहे.