आज शनिवार, दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी सावनेर येथे प्रस्तावित ₹44 कोटींच्या भव्य न्यायालय (कोर्ट) इमारतीच्या उभारणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे सावनेर परिसरातील न्यायालयीन सुविधा अधिक सक्षम होतील. नागरिकांना वेळेत, सुलभ व प्रभावी न्याय मिळण्यास मदत होईल, तसेच स्थानिक पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळेल.