शिरपूर: मुंबई आग्रा राष्ट्रीय पळासनेरजवळ महामार्गावर भीषण अपघात १ ठार, ७० पेक्षा जास्त बकऱ्या मृत्युमुखी, २ जखमी
Shirpur, Dhule | Sep 16, 2025 मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाट परिसरात पळासनेर शिवारात १६ सप्टेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास दोन भरधाव ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात ७० पेक्षा जास्त बकऱ्या मृत्युमुखी पडल्या असून महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.