अटल जिल्हा क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव साठी बोंडगाव देवी सज्ज असून दिनांक २५ डिसेंबर २०२५ ला जिल्हा स्तरीय महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या दृष्टीने आयोजन स्थळाची जिल्हा परिषद गोंदिया चे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी पाहणी केली. आपण सर्वांना या निमित्ताने आमंत्रित करीत आहे. आपण सर्वांनी या आणि आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना प्रोत्साहन द्यावे. असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भेंडारकर यांनी केले.