ठाणे: लखनऊ मध्ये अडकलेल्या बेडेकर शाळेतील मुलांना घरी आणणं गरजेचं, शरद पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान
Thane, Thane | Nov 30, 2025 लखनऊ मध्ये अडकलेल्या ठाण्यातील बेडेकर शाळेतील स्काऊट गाईड मधील १६ मुलामुलींना ठाण्यात परत आणण्यात येणार आहे. या संदर्भात आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास शरद पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी माहिती दिली आहे. लखनऊ मध्ये अडकलेल्या मुलांना घरी आणणं गरजेच आहे असं त्यांनी सांगितलं.