चंद्रपूर: रुग्णवाहिकेच्या धडकेत युवकाचा मृत्यू, नागभीड नागपूर राष्ट्रीय मार्गावरील घटना
नागभीड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ रुग्णवाहिकेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. तेजस मोरेश्वर हांडेकर (२६, रा. गोंविदपूर) असे मृतक तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास घडली. तेजस सहकाऱ्यांसोबत दुचाकीने नागभीड येथे दिवाळीनिमित्त सामान खरेदीसाठी आला होता. घरी परत जात अपघात झाला.