कोपरगाव: मोहनीराजनगर दगडफेक प्रकरण, फरार असलेले आमदार काळेंचे स्वीय सहाय्यक अरुण जोशीसह चौघे शहर पोलिसांना शरण!
मोहिराजनगर परिसरात नवरात्रीत किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या दगडफेक आणि हाणामारीच्या गंभीर घटनेतील फरार आरोपींपैकी चौघे आरोपी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. आ.आशुतोष काळे यांचे स्वीय्य सहाय्यक असलेले अरुण जोशी व राजू जोशी या बंधूंनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता मात्र तो अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज ठेवला नंतर अर्ज माघारी घेतल्याने ते शरण आले आहे.