नेर: नेर शहरात मोकाट श्वानाचा वाढला हैदोस,नागरिक त्रस्त
Ner, Yavatmal | Oct 31, 2025 नेर शहरामध्ये मोकाट श्वानाचा हैदोस वाढला असून नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे.याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले असल्याचा रोष व्यक्त होत आहे.नेर शहरातील नवीन बस स्थानक, जुने बसस्थानक,नवाबपूर, छत्रपती नगर शिवाजीनगर नालंदा नगर आदी परिसरामध्ये मोकाट श्वानाची दहशत आहे.या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.