स्थानीक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका संदर्भात वरिष्ठ स्तरावरुन कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने निवडणूक लढवू इच्छिणारे पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज असून पक्ष संघटना निष्क्रिय झाली असल्याने आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या रामटेक तालुका प्रमुख पदाचा राजीनामा वरिष्ठा कडे दिला असल्याची माहिती तालुकाप्रमुख हेमराज चोखांद्रे यांनी शनि. दि. 25 आक्टोबर ला सायं. 6 वा चे दरम्यान प्रसार माध्यमाना दिली.