वडवणी: कवडगाव येथील डॉ. संपदा मुंडे प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज व्हायरल; तपासाला नवी दिशा
Wadwani, Beed | Oct 29, 2025 वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील डॉ. संपदा मुंडे प्रकरणात पोलिसांना हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, समाज माध्यमांवर गुरुवार, दि. 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता हे फुटेज व्हायरल झाले आहे. या पुराव्यामुळे तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या फुटेजमध्ये डॉ. संपदा मुंडे हॉटेलमध्ये एकट्याच येताना दिसत आहेत. तसेच त्या हॉटेलमधील रूम क्रमांक ११४ मध्ये एकट्याच गेल्याचे स्पष्टपणे दिसून येते.