आर्णी: शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी ‘शोले’ स्टाईल आंदोलन; प्रहार जनशक्ती पक्षाचा अनोखा संताप प्रदर्शन
Arni, Yavatmal | Oct 22, 2025 शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी आज दिनांक 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. शोले चित्रपटातील गब्बरच्या स्टाईलमध्ये पाण्याच्या टाकीवर चढत त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मिळालेल्या माहितीनुसार पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे व शासन ही या शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षा