खुलताबाद: खिर्डीचे सरपंच ज्ञानेश्वर मातकर यांच्या भ्रष्टाचार अपात्रता आदेशावर उच्च न्यायालयाने दिली अंतरिम स्थगिती
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने खिर्डी ग्रामपंचायतचे सरपंच ज्ञानेश्वर मातकर यांच्या अपात्रतेच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली आहे.यामुळे मातकर पुन्हा सरपंच पदावर विराजमान झाले आहेत.अजित पवार गट राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला.सुनिल घुसाळे यांनी मातकर यांच्या विरोधात विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.तक्रारीत विविध कामांमध्ये भ्रष्टाचार व अनियमितता झाल्याचा आरोप होता.