जाफराबाद: निमखेडा येथे शॉर्टसर्किट होऊन शेतकऱ्याचा 15 एकर ऊस जळून खाक,शेतकऱ्यांचे लाखोंच नुकसान
आज दिनांक 20 ऑक्टोबर 2025 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील निमखेडा येथे शेत शिवारामध्ये शॉर्टसर्किट होऊन शेतकऱ्यांचे पंधरा एकर ऊस जळून खाक झाला असून यात शेतकऱ्याच्या लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. उसाच्या शेतापासून गेलेल्या महावितरणच्या विद्युत तारांचे घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले व यात हा ऊस जळून खाक झाला आहे ,यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याने संपूर्ण शेतशिवारात फक्त उसाचा जाळ पाहायला मिळाला आहे.