वाशिम: व्हॅगनार वाहन व मोटर सायकलची धडक, मानोरा शहरातील सृष्टी गार्डन जवळील घटना!
Washim, Washim | Nov 27, 2025 मानोरा शहरातील मानोरा-मंगरूळपीर राष्ट्रीय महामार्गाच्या रोडवर सृष्टी गार्डन जवळ दि. 27 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास व्हॅगनार चार चाकी कार व मोटर सायकल हे दोन्ही वाहन डिव्हायडरच्या मध्यभागातून टर्न करून जाण्याच्या मार्गात असताना धडक झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात वाहनाचे किरकोळ नुकसान वगळता कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.