दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जुलै महिन्यातील लोकशाही दिन ७ जुलै २०२५ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. नागरीकांनी जिल्हास्तरीय लोकशाही दिनातील तक्रार अर्ज जिल्हा/तालुका लोकशाही दिनामध्ये सादर केल्यानंतर विहीत नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह लोकशाही दिनामध्ये १५ दिवस आधी दोन प्रतीत पाठविणे आवश्यक आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी कळवले.