नेर: माणिकवाडा येथे दुचाकीत घुसला साप,सर्पमित्रांनी दिले जीवदान
Ner, Yavatmal | Oct 20, 2025 आज दिनांक 20 ऑक्टोबरला सकाळी अंदाजे नऊ वाजता च्या सुमारास माणिकवाडा येथे थरकाप उडविणारी घटना घडली.साप म्हटले की चांगल्या चांगल्यांच्या मनामध्ये धडकी भरते.धनज येथील महेश नेमाडे यांच्या दुचाकी मध्ये अचानकपणे साप घुसला असता त्याच्या जिवाचा थरकाप उडाला. यावेळी त्याने प्रसंगावधान राखून सर्पमित्र अक्षय ढोमणे याच्याशी संपर्क साधला.सर्पमित्र अक्षय ढोमणे व मयूर भागडकर यांनी घटनास्थळी येऊन अतिशय शिताफीने दुचाकीत घुसलेल्या सापाला बाहेर काढले आणि त्याला निसर्गरम्य वातावरणात सोडले.सापाला सुरक्षित