कवठे महांकाळ: कवठेमहांकाळ येथे शिरढोण पुलावर वायरिंग शॉर्ट झाल्याने ओमनी कार पेटून बेचिराख
रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवरून दोघेजण मिरजवरून सांगोल्याकडे जात असलेली मारुती ओमनी क्रमांक MH 14 N 6340 गाडीमधील वायरिंग अचानक शॉर्ट झाल्याने, गाडीने अचानक पेट घेतला. गाडी अचानक पेटल्याने गाडीतून दोघे उतरले अशी माहिती समजते. मात्र यावेळी आग विझविण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध न झाल्याने, अवघ्या काही क्षणात गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यामध्ये गाडी पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी पडल्याने जळून बेचीराख झाली आहे. सदरची घटना गुरुवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे. य