बिबी येथे २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता एकलव्य फाऊंडेशन द्वारा आयोजित दहावी बारावी च्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन सोहळा मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात व महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई च्या सचिव डॉ सुवर्णाताई खरात, अर्थ शास्त्राचे अभ्यासक संशोधन प्राध्यापक डॉ नरेश बोडखे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.