कोरेगाव: रहिमतपूर नगरपालिका निवडणुकीपूर्वी सशस्त्र संचलन; कायदा व सुव्यवस्था राखण्याचे पोलिसांचे आवाहन
महाराष्ट्रातील सर्वांत प्राचीन अशा रहिमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत येत्या मंगळवार, २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण पार पडावी, तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले असून शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता शहरातून सशस्त्र संचलन करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या संचलनात दोन पोलीस अधिकारी, ७० अंमलदार तसेच राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी सहभागी होती.