भंडारा: भाजप कार्यकर्ते जॅकी रावलानी यांना महसूल मंत्री बावनकुळे व पालकमंत्री भोयर यांची भेट
२३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता च्या सुमारास भंडारा जिल्हा दौऱ्यानिमित्त महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी भाजप कार्यकर्ते जॅकी रावलानी यांच्या भंडारा येथील व्यवसाय स्थळी भेट दिली. विशेष म्हणजे, जॅकी रावलानी यांनी नुकताच शिवसेना (शिंदे गट) सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपात प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर गंभीर आरोपांची फेरी झाडत आपली भूमिका स्पष्ट केली होती.