बोदवड: खिर्डी येथून कपडे शिवायला टाकण्यात जात आहे असे सांगून घरून निघालेली तरुणी बेपत्ता, निंभोरा पोलिसात हरवल्याची तक्रार
Bodvad, Jalgaon | Nov 18, 2025 खिर्डी या गावातील रहिवासी यास्मिन बी नाजीम शेख वय ३० ही तरुणी आपल्या घरी सांगून गेली की मी कपडे शिवण्यासाठी टाकायला टेलर कडे जात आहे असे सांगून घरून निघालेली तरुणी नंतर घरी परत आलीच नाही. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून निंभोरा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे