धुळ्याच्या स्वामीनारायण मंदिरात दिवाळीनिमित्त आयोजित लाईट अँड साऊंड शोने हजारो भाविकांची मनं जिंकली. दृकश्राव्य माध्यमातून मंदिराची रचना, देवतेचं तेज, परिसरातील शांतता आणि संस्कृतीची ओळख प्रभावीपणे दाखवण्यात आली. मंदिर हे केवळ पूजेचं नव्हे, तर कला आणि संस्कृती जपणारं केंद्र आहे, हा संदेश देत आधुनिक तंत्रज्ञानातून परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला.