गोरेगाव: शहीद जाम्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल येथील आवारात दिवाळी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन
आज दिनांक 18 ऑक्टोंबर रोजी शनिवारला सकाळी 11 वाजेच्या सुमारास शहरातील शहीद जाण्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल गोरेगाव येथील आवारात दिवाळी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या हस्तकलेद्वारा दिवाळीच्या विविध ग्रीटिंग व हस्तकलेतून इतर साहित्य बनविले होते. हस्तकलेतून बनविलेले ग्रीटिंग्स आकर्षणाचे केंद्र ठरले. यावेळी शाळेचे प्राचार्य सुनील हरिणखेडे अजित रामटेके यासह मोठ्या संख्येत शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.