आज दिनांक 23 डिसेंबरला पोलीस सूत्रांकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चांदूरबाजार येथे अतिक्रमणाचा खोका हटविण्या करिता केलेल्या उपोषणाच्या कारणावरून झालेल्या भांडणात लाकडी काठीने मारून जखमी केल्याची घटना दिनांक 22 डिसेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता च्या दरम्यान उघडकीस आली आहे. याबाबतीत संघदीप सुदामराव दांडगे यांनी चांदूरबाजार पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या तक्रारीवरून चांदूरबाजार पोलिसांनी महिलांसहित चार जनावर गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे