जालना: अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील आणखी एक आरोपी जालना आर्थिक गुन्हे शाखेकडून अमरावतीत अटक
Jalna, Jalna | Sep 20, 2025 जालना - अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील फरार आरोपी शिवाजी श्रीधर ढालके याला आर्थिक गुन्हे शाखा, जालना यांनी अमरावती येथून अटक केली असल्याची माहिती शनिवार दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता पोलीस सुत्रांनी दिली. या प्रकरणात आतापर्यंत 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांचा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले असून यापूर्वीही एक आरोपीला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी मा. जिल्हाधिकारी जालना यांच्या आदेशानुसार गठीत करण्यात आलेल्या समितीने केली होती.समितीच्या अहवालानुसार गुन्हे दाखल केले.