मोर्शी: आलोडा येथील इसमाची तोतयेगिरीकरून फसवणूक, पोलीस असल्याचे सांगून सोन्याची अंगठी लंपास. बेनोडा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
आज दिनांक 13 डिसेंबरला नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आलोडा रहिवासी असलेल्या साहेबराव महादेवराव गावंडे नावाच्या इसमाला झुंज फाट्याजवळ १२ डिसेंबरला बारा वाजून 40 मिनिटांनी दुचाकी वर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी पोलीस असल्याचे सांगून बोटातील सोन्याची अंगठी काढावयास सांगून नकली अंगठी देऊन पळ काढला. एकाच दिवशी अशा दोन घटना घडल्या असल्याची तक्रार बेनोडा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे