भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून भंडारा शहरातील ऐतिहासिक गांधी चौक येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 28 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता दरम्यान करण्यात आले होते, ज्यामध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी आपली उपस्थिती दर्शवली. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना खासदार पडोळे यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नसून लोकशाही, संविधान, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकास या मूल्यांचा खंबीर वारसा आहे