आरमोरी: जोगीसाखरा -सालेमारा मार्गावर पिक अपचा धडकेत यूवकाचा मृत्यु तर पत्नी व मूलगी गंभीर जखमी
पिकअप वाहनाच्या धडकेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यु झाला असुन दूचाकीवर बसलेली पत्नी व मूलगी गंभीर जखमी झाल्याची घटणा जोगीसाखरा ते सालमारा मार्गावर नाल्याजवळ आज दि.५ आक्टोबंर रविवार रोजी दूपारी १ वाजेचा सूमारास घडली. जोगीसाखरा येथील सुजीत शामराव सोरते वय २६वर्ष हा आपल्या पत्नी व मुलींसह सासूरवाडी मेंढेबोडी येथे मोटारसायकल क्र एम एच ३३आर ३१२६ने जात असतांना जोगीसाखरा पासुन एक किमी अंतरावर सालमारा जवळ अपघात झाला.