जालना: आज दिनांक २५/२/२६ रोजी शिबीरामध्ये जालना जिल्ह्यातील एकुण ४० विकृतीग्रस्त कुष्ठरुग्णांची उपस्थिती होती. विकृतीच्या रुग्णांना भौतिकउपचाराचे (फिजिओथेरेपी) प्रात्यक्षिक करण्यांत आले व रुग्णाकडुन करुन घेण्यांत येऊन नियमित करण्यास सांगितले. रुग्णांना लागणारे भौतिक उपचाराचे साधने वाटप करण्यांत आले. उदा.एमसीआर चप्पल, गॉगल, अल्सर किट इ.सामुग्री डॉ.सुधाकर शेळके, सहाय्यक संचालक,आ.से कुष्ठरोग जालना यांच्या हस्ते वाटप करण्यांत आले. सन २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसार हे ध्येय साध्य करण्यासाठी सदरील शिबीर आयोजित करुन मार्गदर्शन करण्यांत आले.