जाफराबाद: हिवरा बळी येथे पार पडला मा.केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा कार्यकर्ता संवाद मेळावा
आज दिनांक 12 ऑक्टोंबर 2025 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजता जाफराबाद तालुक्यातील हिवराबळी येथे भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा कार्यकर्त्यांशी संवाद मेळावा पार पडला आहे, या मेळाव्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी व तरुणांच्या व ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत राज्य सरकार व केंद्र सरकारच्या योजने संदर्भात माहिती दिली आहे ,यावेळी गावातील व परिसरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.