रामटेक विधानसभा क्षेत्रातील देवलापार,पारशिवनी भागात वाघ, बिबट च्या हल्ल्यात मानवा सहित पशूंचाही बळी जात आहे.वाघ, बिबट यांची संख्या बरीच वाढली असल्याने होणाऱ्या हल्ल्यासंबंधी सदनमध्ये चर्चा करून येत्या तीन दिवसात या विषयावर उपाययोजना करणार असल्याचा विश्वास राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी शुक्रवार दि. 11 डिसेंबर ला प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केला.