मुंबई: मुंबई मेट्रो लाईन-३ चा अंतिम टप्पा आजपासून मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. हा टप्पा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड असा प्रवास
Mumbai, Mumbai City | Oct 8, 2025
मुंबई मेट्रो लाईन-३ चा अंतिम टप्पा आजपासून मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. हा टप्पा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड असा आहे. या भागाचे लोकार्पण झाल्यानंतर मेट्रो-३ गोरेगाव आरे ते कफ परेड असा संपूर्ण प्रवास मुंबईकरांना थेट करता येणार आहे. यापूर्वी मेट्रो-३ दोन टप्प्यांत म्हणजे आरे ते बीकेसी (BKC) आणि बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) अशी सुरु होती.