अकोला: बाळापूर तालुक्यात तरुणाची निर्घृण हत्या; मित्राच्या वादात मध्यस्थी करायला गेलेल्या गौरव बावस्कारचा जागीच मृत्यू..
Akola, Akola | Dec 1, 2025 अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीत आज सकाळी १०:३० वाजता एक धक्कादायक घटना घडली. हाता अंदुरा येथील २४ वर्षीय गौरव गणेश बावस्कार हा कारंजा येथील जिजामाता महाविद्यालयात शिक्षण घेत होता. मित्राच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी तो कारंजा फाट्याजवळ गेला असता तीन ते चार जणांनी त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. पोट, छाती, पाठ आणि कंबरेवर आठ ते दहा चाकूने वार झाल्याने गौरवचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक पंकज कांबळे यांनी पथकासह धाव घेत पंचनामा केला.