दिग्रस शहरातील कमानगेट परिसरातील स्वातंत्र्यसैनिक स्मारकाकडे नगरपरिषदेकडून मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे. काही वर्षांपूर्वी लाखो रुपयांचा खर्च करून येथील सौंदर्यीकरण करण्यात आले होते. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे टाईल्स उखडल्या, तसेच पालिकेच्या दुर्लक्षामुळे येथील परिसर अस्वच्छ झाले. काही महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा दुरुस्ती आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली काम सुरू करण्यात आले, मात्र काम सुरू न केल्याने परिसर अस्वच्छ, कचऱ्याने भरलेला व दुर्दशाग्रस्त झाला आहे